04 March 2021

News Flash

पुण्यातील मुळा, मुठा शुद्धीकरणासाठी जपानसोबत १००० कोटींचा करार

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा या भीमेच्या उपनद्या आहेत.

पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धीकरणासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’सोबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बुधवारी करार केला. या अंतर्गत या दोन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जपानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्ज स्वरूपात हा निधी भारताला मिळणार असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून सांगितले.


पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा या भीमेच्या उपनद्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये विविध ठिकाणी सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर कचऱ्यामुळे दोन्ही नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जपानसोबत करण्यात आलेला करार महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी या कराराचे स्वागत केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत. २०२२ पर्यंत यासाठी पुण्यामध्ये सहा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कर्जाची परतफेड केंद्र सरकारकडूनच करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 1:52 pm

Web Title: rs 1000 cr soft loan for mula mutha river cleaning project
टॅग : Prakash Javadekar
Next Stories
1 पाकिस्तानमध्ये आत्मघाती स्फोटात १५ जणांचा मृत्यू
2 बैलगाडी शर्यतीवर बंदीच
3 पाकिस्तानला एफ १६ जेट विमाने विकण्यास अमेरिकी काँग्रेसचा विरोध
Just Now!
X