शहरातील चौकात झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नये असे फलक लावले असले तरी गेल्या दीड वर्षांत झेब्राक्रॉसिंगवर वाहने उभे करणाऱ्या ५३ हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५४ लाख रूपयांचा दंड वसुल केला आहे.
झेब्रा क्रॉसिंगव वाहने उभे केल्यास पादचाऱ्यांना रस्ता ओलाडण्यास आडचणी येतात. याबाबत वाहनचालकांमध्ये प्रबोधन केले असले तरी गेल्या वर्षांत  झेब्राक्रॉसिंगवर वाहन उभे केल्यामुळे ४० हजार ६७५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४१ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, जून २०१३ अखेपर्यंत ५३ हजार २२७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच गेल्या आठवडय़ात वाहतूक शाखेकडून चुकीच्या नंबर प्लेट लावणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम राबविणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या दहा दिवसांमध्ये चुकीच्या नंबर प्लेट लावणाऱ्या ९७४ वाहनचालकांवर कारवाई करून एक लाख रुपये दंड वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.