03 March 2021

News Flash

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ लवळेकर यांचे निधन

राजाभाऊ लवळेकर यांनी अनेक वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात काम केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी, न्यू इंग्लिश स्कूल रमणबागचे माजी मुख्याध्यापक, ‘तरुण भारत’चे माजी संपादक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी कृष्णाजी गोविंद लवळेकर (वय ८७) यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते राजाभाऊ या नावाने परिचित होते. लवळेकर यांच्यावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजाभाऊ लवळेकर यांनी अनेक वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात काम केले. पिंपरीच्या एच. ए. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक तसेच रमणबाग प्रशालेचे ते मुख्याध्यापक होते. संघातील अनेकविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. संघाचे पुणे महानगर कार्यवाह म्हणूनही लवळेकर यांनी काम केले होते. ‘स्व-रूप’वर्धिनी या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते तसेच ‘संस्कार भारती’चे पश्चिम क्षेत्र अध्यक्ष म्हणूनही लवळेकर यांनी काम केले होते. एकता मासिकाचे व्यवस्थापक तसेच तरुण भारत या दैनिकाचे ते काही वर्षे संपादक होते. ज्ञानदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, असा परिवार आहे. लवळेकर यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोकराव कुकडे, संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव, सतीश आळेकर यांच्यासह संघपरिवारातील कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. लवळेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी (१९ जून) सायंकाळी सात वाजता नवीन मराठी शाळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 3:32 am

Web Title: rss senior leader rajabhau lavalekar passed away
Next Stories
1 अवैध धंदे आढळल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई 
2 पिंपरीत राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठय़ावर;  हॅट्ट्रिक साधण्याचे अजित पवारांपुढे आव्हान
3 पावसाळ्यासाठी शहरातील वीज यंत्रणा सज्ज
Just Now!
X