26 February 2021

News Flash

महापौरांच्या स्वत:च्या कार्यक्रमातच नियमांना तिलांजली

शहर पातळीवर महापौर व आयुक्तांच्या नावाने जनजागृतीचे आवाहन केले जात आहे.

महापौरांच्या कार्यक्रमासाठी झालेली तुडुंब गर्दी.

पिंपरी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांना तसेच खबरदारी बाळगण्याच्या आवाहनाला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधीनींसह अनेकांनी हरताळ फासण्याचे काम चालवले आहे. मेळावे, मोर्चे, आंदोलने, वाढदिवस अशा कार्यक्रमांमुळे सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. यात कहर म्हणजे, शहराच्या महापौरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातच सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले आहे.

वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने सोमवारपासून नव्याने निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, मुखपट्टीचा वापर करावा आदी शासननियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही करण्यात येत आहे. शहर पातळीवर महापौर व आयुक्तांच्या नावाने जनजागृतीचे आवाहन केले जात आहे. असे असताना खुद्द महापौर माई ढोरे यांनीच चिंचवडला आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियमांचे तीन तेरा वाजले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मिसेस पिंपरी-चिंचवड’ या कार्यक्रमाचे महापौरांनी आयोजन केले. नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी तुडुंब गर्दी झाली. खुच्र्यांवर ‘एका आड एक’ याप्रमाणे न बसता सरसकट सर्व खुच्र्यांवर नागरिकांना, महिलांना बसवण्यात आले. बहुतेकांनी मुखपट्टी घातलेली नव्हती. स्वतङ्म महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविकांचाही त्यात समावेश होता. मुखपट्टी न घातलेल्या नगरसेवक व कार्यकत्र्यांनी ‘रॅम्प वॉक’ची  हौस पूर्ण करून घेतली. नाट्यगृहात गर्दी उसळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे आले. मात्र, थेट कार्यक्रम बंद पाडण्याचे धाडस त्यांनी दाखवले नाही. महापौरांसह नगरसेवकांशी पोलिसांची चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यक्रम घाईने संपवण्यात आला.

माझ्या कार्यकत्र्यांचा कार्यक्रम होता. काही जणांनी मुखपट्टी घातली नव्हती. नगरसेवकांनी ‘रॅम्प वॉक’ केले नाही. इतर काही तेथे घडले नाही. सर्व नियमांचे पालन करूनच कार्यक्रम पार पडला.     – माई ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:02 am

Web Title: rules were broken in the mayor own program akp 94
Next Stories
1 गुंड गजा मारणेची समाजमाध्यमावर दहशत
2 शनिवारवाड्याला पर्यटकांची पसंती
3 स्मार्ट विकासाच्या कोंडीतील प्रभाग
Just Now!
X