24 September 2020

News Flash

अपात्र ठेके दाराला आंबिल ओढय़ाचे काम

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आंबिल ओढय़ाला महापूर आला होता

पुणे : महापालिके ने अपात्र ठरविलेल्या ठेके दाराला आंबिल ओढय़ालगतच्या सीमाभिंती बांधण्याचे काम देण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. पथ विभागाच्या एका कामात ठेके दाराने गैरव्यवहार के ल्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकू न महापालिके ची कामे करण्यास अपात्र ठरविण्यात आले होते. त्याबाबत ठेके दाराची चौकशी प्रलंबित असूनही आंबिल ओढय़ाचे काम ठेके दाराला दिल्याचे उघड झाले आहे. अपात्र ठेके दाराला काम देण्याचा स्थायी समितीचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आंबिल ओढय़ाला महापूर आला होता. महापुरामुळे ओढय़ालगतच्या सीमाभिंती पडल्याच्या घटना घडल्या होत्या. आंबिल ओढय़ालगतच्या अनेक सोसायटय़ांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे सीमाभिंती बांधण्याचे काम महापालिके कडून हाती घेण्यात आले होते. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. तीन टप्प्यात त्यासाठी निविदा काढण्यात आल्या.

के . के . मार्केट ते पद्मावती पूल आणि गजानन महाराज चौक ते वैंकुठ स्मशानभूमीजवळील ओढा ज्या ठिकाणी मुठा नदीला मिळतो तिथपर्यंतच्या कामासाठी ६ कोटी १८ लाख रुपयांची कामे सावी इन्फ्रास्ट्रक्चर्स अ‍ॅण्ड प्रॉपर्टीज या कं पनीला देण्यात आली आहेत. याशिवाय गजानन महाराज चौक ते पेशवे तलाव या दरम्याचे कामही या कं पनीला देण्यात आले आहे. मात्र या ठेके दाराला महापालिके ने काळ्या यादीत टाकले आहे.

महापालिके च्या पथ विभागाने या ठेके दाराला कल्व्हर्ट उभारणीचे काम दिले होते. त्यावेळी चढय़ा दराने निविदा दाखल करून कामात गैरव्यवहार झाल्याचे पथ विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. या ठेके दाराविरोधात राज्याच्या नगर नियोजन विभागाकडेही तक्रार नोंदविण्यात आली होती.

या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिके ला दिले होते. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू न या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. महापालिके तील कामे करण्यास ठेके दाराला अपात्र ठरविण्यात आले होते. तशी शिफारसही अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांनी के ली होती. मात्र चौकशी अहवाल प्रलंबित असतानाच प्रशासनाकडून या ठेके दाराला काम देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल आणि काँग्रेसचे माजी गटनेता अरविंद शिंदे यांनी त्याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारीचे निवेदनही दिले होते. त्यानंतरही स्थायी समितीमध्ये या ठेके दाराला सीमाभिंती उभारण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे स्थायी समितीचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 3:15 am

Web Title: ruling bjp decided to give boundary wall construction work to ineligible contractor zws 70
Next Stories
1 करोना रुग्णांसाठी रेल्वेचे ६० डबे अद्यापही वापराविना
2 उद्योगनगरीतील प्रमुख मंडळांचा जनजागृतीचा निर्धार
3 ‘सीईटी’बाबत आठ दिवसांत निर्णय
Just Now!
X