भारताच्या एकसंधतेसाठी ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील ५६२ संस्थाने देशामध्ये विलीन करून घेणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात भव्य पुतळा गुजरातमध्ये साकारण्यात येत आहे. सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रविवारी (१५ डिसेंबर) देशभरातून लोखंड संकलनाची मोहीम राबविण्यात येणार आहे. देशाच्या एकात्मतेसाठी ‘रन फॉर युनिटी’ हा उपक्रमही ५६२ ठिकाणी होणार आहे.
गुजरातच्या महसूलमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. युवा नेत्या पूनम राव, खासदार जयश्रीबेन पटेल, सी. आर. पाटील, सुरतचे महापौर निरंजन झांझमेरा, आमदार ऋषिकेश पटेल यांच्यासह भाजप शहराध्यक्ष अनिल शिरोळे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन या वेळी उपस्थित होते. मॉडर्न प्रशाला येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आनंदीबेन पटेल या अभियानाची माहिती दिली.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टतर्फे नर्मदा सरोवरातील सातू बेटावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे. १८२ मीटर उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. त्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्याच उद्देशातून देशभरातील १ लाख ८७ हजार गावांतून लोखंडी अवजारे आणि मातीचे संकलन करण्यात येणार आहे. सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीदिनी १५ डिसेंबरला ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. देशभरात नागरिकांकडून देशासाठी योगदान देण्याची शपथही (सुराज्य पिटिशन) लिहून घेण्यात येणार आहे. देशभरातील ५६५ ठिकाणी होणाऱ्या या उपक्रमामध्ये सहभागींमुळे त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होईल, असेही पटेल यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तालुका, जिल्हा, राज्य आणि देश अशा विविध स्तरांवरील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या मुलांच्या शाळांना मिळून अडीच कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
94 thousand mill workers are eligible home
आतापर्यंत ९४ हजार गिरणी कामगार पात्र, चार हजार कामगार अपात्र
supreme court
पुरवणी आरोपपत्रांवरून ईडीची खरडपट्टी; जामीन मिळण्याच्या अधिकाराचे हनन- सर्वोच्च न्यायालय