सर परशुरामभाऊ महाविद्यालय (स.प.) आता शंभरीत पदार्पण करत असून त्या निमित्ताने महाविद्यालयांत नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या परिसरात वाय-फाय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
टिळक रस्त्यावर दिमाखात उभ्या असणाऱ्या स. प. महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षांचा शुभारंभ १४ जूनला होत आहे. या दिवशी आजी-माजी विद्यार्थ्यांसह पहाटे ५ वाजता सारसबागेतील गणेश मंदिरात पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर नू.म.वि. शाळा ते स. प. महाविद्यालय अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शताब्दी वर्षांनिमित्त महाविद्यालयांत नॅनो टेक्नॉलॉजी, अवकाश शास्त्र, पर्यावरण शास्त्र, विधी संशोधन केंद्र असे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वायफाय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल, असे शेठ यांनी सांगितले. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष अनंत माटे उपस्थित होते.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !