News Flash

‘ग्राहक पेठे’च्या अध्यक्षपदी डॉ. भा. र. साबडे यांची निवड

ग्राहक पेठेच्या अध्यक्षपदी डॉ. भा. र. साबडे यांची आणि उपाध्यक्षपदी संध्या भिडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ग्राहक पेठेच्या अध्यक्षपदी डॉ. भा. र. साबडे यांची आणि उपाध्यक्षपदी संध्या 5sandhya-bhideभिडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नवीन सहकारी कायद्यानुसार २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी ग्राहक पेठेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये उल्हास फडके, विश्वास देसवंडीकर, महेश जोशी, सुनंदा गोखले, रमेश गोंदकर, अजय देवस्थळे, मधुकर नगरे, संजय कुलकर्णी, अनंता दळवी आणि परिमल लोखंडे यांचा समावेश आहे. आगामी काळात ग्राहक पेठेचे काम अधिकाधिक कार्यक्षमतेने राबविण्यासाठी ऑनलाईन बिझनेस, घरपोच सेवा, त्याचप्रमाणे कमी उत्पन्न गटासाठी अत्यावश्यक किराणा माल रास्त दरात उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाबरोबरच ग्राहक प्रबोधन आणि ग्राहकहित रक्षणाचे कार्य डोळ्यासमोर ठेवून ग्राहक सेवा कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करू, असे ग्राहक पेठेचे कार्यकारी विश्वस्त सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 3:10 am

Web Title: sabade and bhide elected as chairman and deputy chairman
Next Stories
1 राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर
2 खुद्द महापौरांच्या प्रभागातील खोदकामे थांबेनात
3 – नारायण पेठेतील जमीन शहरात सर्वात महाग
Just Now!
X