मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून पुणे महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या साहित्य कट्टा उपक्रमाचे संभाजी उद्यानामध्ये संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शहरातील विविध उद्यानांमधील पर्यटकांना कथा, कविता, कादंबरी अशा वाङ्मयाच्या विविध दालनांची माहिती व्हावी या उद्देशातून साहित्य कट्टा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विजय काळे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मनसे गटनेते राजेंद्र वागसकर, नगरसेविका मुक्ता टिळक, वनिता वागसकर, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, गणेश सोनुने, प्रीती सिन्हा यांच्यासह महापालिका भाषा संवर्धन समिती सदस्य या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, शहरामध्ये केवळ पायाभूत सोयीसुविधा पुरविणे एवढेच महापालिकेचे काम नसून नागरिकांमध्ये साहित्य आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणे अपेक्षित आहे. साहित्यिक कट्टा निर्माण करून महापालिकेने मराठी संवर्धनाचा हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे.
या साहित्य कट्टय़ामुळे भावी लेखक-कवी निश्चितपणे निर्माण होतील, अशी अपेक्षा वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली. प्रशांत जगताप म्हणाले, साहित्य आणि संगीत हे जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. पुण्यनगरी ही थोर साहित्यिकांची नगरी असून सामाजिक माध्यमांमध्ये गुंतलेल्या मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी हा साहित्य कट्टा योगदान देईल. गजलकार प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल गोरे यांनी आभार मानले. अलका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य