News Flash

‘सैराट’च्या पायरसीवरून पहिला गुन्हा दाखल

कासम दस्तगीर शेख(२३) या तरुणाचे स्वारगेट परिसरात मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे.

The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाची पायरसी करणाऱया एका तरुणावर स्वारगेट पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. कासम दस्तगीर शेख(२३) या तरुणाचे स्वारगेट परिसरात मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे. कासमच्या दुकानातून चित्रपटाची पायरसी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी कासम शेख याला रंगेहाथ पकडले.

‘सैराट’ची मूळ प्रिंट लीक, नागराज मंजुळेंची पोलिसांकडे तक्रार 

कासम शेख केवळ १०० रुपयांत ‘सैराट’ चित्रपटाची प्रिंट ‘पेन ड्राईव्ह’वर ट्रान्सफर करून दिली. याप्रकरणी पोलिसांनी कासम शेखविरोधात परवानगी नसतानाही चित्रपटाची कॉपी बाळगणे आणि तिचा प्रसार करणे याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्याजवळील साहित्य देखील जप्त करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2016 8:11 am

Web Title: sairat film piracy in pune police case registered
Next Stories
1 पिंपरीच्या आयुक्तांचे ‘नागपूर कनेक्शन’
2 पाणी सोडल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
3 ‘महावितरण’कडे ऑनलाइन वीजबिल भरण्यात राज्यात पुणेकर आघाडीवर!
Just Now!
X