संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक शरद पोखरकर यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये पोखरकर यांना गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांच्या पाठीवरही मारहाणीचे वळ उमटले आहेत. याप्रकरणी ५० कार्यकर्त्यांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पोखरकर हे दरवर्षी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे मोफत वाटप करतात. यावर्षी ते अवसरी खुर्द येथील शाळेत पुस्तकांच्या प्रति ते वाटणार होते.
याविषयी त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांशीही बोलणे झाले होते. मात्र हे पुस्तक चांगले नाही असे म्हणत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांनी या पुस्तक वाटपाला विरोध दर्शवला. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी आहे त्यामुळे हे पुस्तक वाटले जाऊ नये अशी भूमिका घेण्यात आली त्याचमुळे या पुस्तक वाटपाला विरोधही करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji brigades sharad pokharkar beaten by bajrang dal activists
First published on: 19-02-2018 at 19:51 IST