भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचे मत
सरकारकडून शेतकरी, कामगार व उद्योगपतींकडे एका नजरेने पाहिले जात नाही आणि तिघांसाठी समान कायदे केले जात नाहीत, तोपर्यंत ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होऊ शकणार नाही, असे मत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत मडाडिक यांनी व्यक्त आहे.
मुळशी सत्याग्रहाच्या ९५ व्या स्मृतिदिनानिमित्त हिंजवडी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी संपर्कप्रमुख मनोहर गायके, सत्यवान उभे, बाळासाहेब चांदेरे,
मच्छिंद्र ओझरकर, मनोहर भिसे, जयसिंग पोवार, दत्तात्रय टेमघरे, सूर्यकांत साखरे, माउली शिंदे आदी उपस्थित होते. महाडिक म्हणाले, मूठभर उद्योगपती व नतद्रष्टांकडून महाराष्ट्र तोडण्याची भाषा सुरू आहे. शेतकरी व कामगार जोपर्यंत एकत्र आहेत, तोपर्यंत कोणीही महाराष्ट्राचे तुकडे पाडू शकणार नाही. देशात ९३ टक्के कंत्राटी कामगार आहे, त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. टेमघरे म्हणाले, अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. प्रास्तविक सूर्यकांत साखरे यांनी केले.