News Flash

CCTV : दोन अट्टल सोनसाखळी चोरांना सांगवी पोलिसांनी केलं जेरबंद

१६ तोळे सोनं आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलिसांनी शुक्रवारी दोन अट्टल सोनसाखळी चाोरांना जेरबंद केलं आहे. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल १६ तोळे सोनं आणि दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सध्याच्या बाजारात या सोन्याची किंमत सात लाखांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महेश तुकाराम माने आणि गणेश हनुमंत मोटे अशी आरोपींची नावं असून त्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश आणि गणेश हे उपजिवीकेसाठी सांगवी पोलिस ठाण्याच्या समोरील चौपाटी भागात मिळेल ते काम करायचे. मात्र पैशासाठी त्यांनी सोनसाखळी चोरण्याकडे आपला मोर्चा वळवला. पोलिसांना आपल्या कृत्याची माहिती कळाली हे समजताच दोन्ही आरोपींनी आपल्या राहत्या घरातून पळ काढला. यानंतर आरोपी महेश हा पिंपळे निलख परिसरात येणार असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचत महेशला अटक केली. महेशच्या चौकशीनंतर पोलिसांनी गणेशलाही ताब्यात घेतलं.

या दोन्ही आरोपींवर चोरीचे १० तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी आरोपींजवळच्या दोन दुचाकी आणि इतर सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. महेश आपल्या आईच्या मदतीने चोरलेलं सोनं स्थानिक सोनाराकडे विकत असल्याचंही समोर आलं. यावरुन पोलिसांनी सोनारांकडचा मुद्देमालही ताब्यात घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 1:46 pm

Web Title: sangvi police in pimpri chinchwad caught 2 notorious chain snatcher psd 91
Next Stories
1 पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज – राजनाथ सिंह
2 नसीरुद्दीन शाह यांना तन्वीर सन्मान
3 वाहन परवान्याची चाचणी कठीण
Just Now!
X