News Flash

सोलापुरच्या उपमहापौरांना शिंका आणि खोकला येत असल्याने सांगवी पोलिसांनी सोडले

पोलिसांची भूमिका संशयास्पद; वरिष्ठांनी दिले चौकशीचे आदेश

प्रातिनिधिक फोटो

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सांगवी पोलिसांनी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात शुक्रवारी अटक केली होती. परंतु त्यांना आज शिंका आणि खोकला येत असल्याने वैद्यकीय तपासणी करून नोटीस बजावत सोडण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे यांनी सांगितले आहे.

मात्र, सांगवी पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटत असल्याने याप्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

भाजपाचे सोलापूर येथील उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना सांगवी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी नीता सुरेश लोटे, तत्कालीन बँक मॅनेजर (नाव माहीत नाही) यांच्यावर ही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या घटने प्रकरणी फिर्याद श्रीमती सिंधू सुभाष चव्हाण वय-६३ यांनी फिर्याद दिलेली आहे.

काळे व त्यांच्या अन्य साथीदारांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सदनिका (फ्लॅट) अनेकांना विकून आर्थिक फसवणूक केली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात येऊन येथील विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली होती.

परंतु, आज त्यांना अचानक शिंका आणि खोकला येत असल्याने नोटीस बजावत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे तपास अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आल्याने अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सत्यता पडताळून पुढील कार्यवाही करू असे ही ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 9:34 pm

Web Title: sangvi police release deputy mayor of solapur for coughing kjp 91 dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात दिवसभरात १०८ करोना बाधित रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
2 पिंपरी-चिंचवड : करोना बाधित रुग्णांची संख्या ५०० पार, दिवसभरात १८ नवीन रुग्ण
3 करोना संकटाशी सामना करीत वृद्ध आई करतेय अपंग असहाय्य मुलाचा सांभाळ
Just Now!
X