25 September 2020

News Flash

संजय दत्त पुन्हा तीस दिवसांसाठी कारागृहाबाहेर

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी पुन्हा तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली.

| August 27, 2015 04:22 am

अभिनेता संजय दत्त

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी पुन्हा तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली. मुलीचे वैद्यकीय कारण देऊन त्याने या रजेसाठी जूनमध्ये अर्ज केला होता. रजेची मंजुरी मिळताच संजय दत्तला बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर तो मुंबईकडे रवाना झाला.
मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यास शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मे २०१३ मध्ये संजय दत्तची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये त्याला फलरे रजा मंजूर करण्यात आली होती. त्यात पुढे १४ दिवसांची वाढ करण्यात आली. जानेवारी २०१४ मध्ये त्याला तीस दिवसांची संचित रजा मंजूर झाली. ही रजाही साठ दिवसांपर्यंत वाढविण्यात आली होती. डिसेंबर २०१४ मध्ये १४ दिवसांची फलरे त्याला मिळाली. ही रजा वाढवून देण्यासाठीही त्याने प्रयत्न केले, मात्र त्यावर टीका झाल्याने ही मागणी मंजूर झाली नाही. संजय दत्तने आतापर्यंत १४६ दिवसांची रजा उपभोगली आहे. मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्याचे कारण देऊन त्याने पुन्हा रजेसाठी अर्ज केला होता. या अर्जावर विभागीय आयुक्त चोक्किलगम यांनी दोन दिवसांपूर्वी निर्णय घेतला व रजा मंजूर केली. संजय दत्तने योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बुधवारी दुपारी त्याला कारागृहातून सोडण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.
पत्नी मान्यता व कधी मुलीवरील उपचाराचे कारण देऊन संजय दत्तकडून वेळोवेळी रजा घेतली जात असल्याने कारागृह प्रशासन त्याला झुकते माप देत असल्याची टीका सातत्याने करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 4:22 am

Web Title: sanjay dutt granted 30 day parole
टॅग Sanjay Dutt
Next Stories
1 परप्रांतीयांच्या विरोधातील राजकारण भाजपला अमान्य- गिरीश बापट
2 पाहुणा ठरत नसल्याने िपपरीत बीआरटीचे उद्घाटन रखडले
3 लक्ष्मणांच्या ब्रशला धरुनच व्यंगचित्रांच्या प्रांतात आलो!
Just Now!
X