News Flash

टाळ मृदंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थित सोहळा पडला पार

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

देवाच्या आळंदीमध्ये अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. करोनाचं संकट असल्याने यावर्षीची पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून आजोळ घराच्या देऊळ वाड्यात विसावणार आहेत. ३० जूनला शासनाने दिलेल्या पर्यायांपैकी एकाचा अवलंब करून, पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यात येणार आहेत.

आळंदीमध्ये दरवर्षी वैष्णवांचा मेळा भरला जातो. मात्र, करोना महामारीमुळे या वर्षीची आषाढी वारी सोहळा रद्द करण्यात आला असून, अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांनी प्रस्थान ठेवले आहे. यावेळी इंद्रायणी काठी अत्यंत शांततामय वातावरण पहायला मिळाले. दरवर्षी आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल होतात. मात्र, यावर्षी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायकडून अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत न येण्याचे आवाहन केले होते. वारकरी संप्रदायाने त्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातूनच थेट प्रक्षेपणाद्वारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पाहिला डोळ्यात साठवला.

आळंदीमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आलेली असून, मंदिर परिसरात निर्बंध घालण्यात आलेले आहेत. अवघा मंदिर परिसर हा टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानबा माऊली तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आजोळ घरातील देऊळ वाड्यात विसवणार आहेत. त्यानंतर ३० जून ला हेलिकॉप्टर किंवा बसमधून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 6:34 pm

Web Title: sant dnyaneshwar maharaj palkhi depart to pandharpur bmh 90 kjp 91
Next Stories
1 पुण्यात तात्पुरत्या उभारलेल्या कारागृहातून दोन कैद्याचे पलायन
2 बारा दिवसांच्या नवजात बाळासह आईने केली करोनावर मात
3 अकरावीच्या परीक्षा घेणाऱ्या महाविद्यालयाविरोधात गुन्हा
Just Now!
X