News Flash

सतीश आळेकर यांना तन्वीर सन्मान

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना यंदाचा तन्वीर सन्मान जाहीर झाला आहे. ए

सतीश आळेकर , फैजे जलाली

फैजे जलाली हिला नाटय़धर्मी पुरस्कार

रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना यंदाचा तन्वीर सन्मान जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबई येथील फॅटस थिएटरची संस्थापक फैजे जलाली हिला नाटय़धर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ३० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम यांचा तन्वीर हा एकुलता एक मुलगा. एका दुर्दैवी अपघातामध्ये त्याचे निधन झाले. तन्वीर याच्या वाढदिवशी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ रंगभूमीच्या संदर्भात अखिल भारतीय स्तरावर महनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीला तन्वीर सन्मान प्रदान केला जातो. यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे शनिवारी (९ डिसेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण खोपकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लागू आणि कार्यवाह दीपा श्रीराम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘महानिर्वाण’, ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, ‘शनिवार-रविवार’, ‘दुसरा सामना’ आणि ‘एक दिवस मठाकडे’ या सतीश आळेकर यांच्या नाटकांनी मराठी प्रायोगिक रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला. वास्तववादाच्या चौकटीतून बाहेर पडून ‘ब्लॅक ह्य़ूमर’ आणि ‘अ‍ॅबसर्डिटी’ने रंगलेल्या त्यांच्या नाटकांनी मध्यमवर्गीयांचं जगणं रंगमंचावर उभं केल. आळेकरांच्या या नाटकांचे इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांमध्ये रूपांतर झाले आहे. ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’चे ते संस्थापक सदस्य आहेत.  फोर्डस फाउंडेशनच्या सहकार्याने घेतलेल्या नाटककारांच्या कार्यशाळा, महाराष्ट्रभर नाटय़विषयक केंद्राची केलेली उभारणी यातून प्रायोगिक नाटकाच्या सीमा पुण्या-मुंबईबाहेर नेण्याचे श्रेय आळेकर यांना जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटय़विषयक अभ्यासक्रमाची बांधणी आणि ललित कला केंद्राच्या स्थापनेमध्ये आळेकर यांचे मोलाचे योगदान असून त्यांचे विद्यार्थी नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रात झळकताना दिसतात. संगीत नाटक अकादमी, पद्मश्री असे अनेक महत्त्वाचे सन्मान लाभलेल्या आळेकर यांनी परदेशी विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

अभिनेत्री, दिग्दर्शिका, नृत्यसंरचनाकार, शिक्षिका आणि लेखिका अशा विविध रूपात फैजे जलाली रंगभूमीवर कार्यरत आहे. विविध विद्यापीठांमधून रंगभूमीविषयक शिक्षण घेतलेल्या फैजे हिने जॅझ, बॅले, कल्लरी, कोडिअट्टम आणि यक्षगान अशा कलाप्रकारांचे प्रशिक्षण घेतलेले आहे. भारतीय तसेच परदेशातील अनेक नाटकांतून तिने भूमिका केल्या आहेत.

‘आय डोन्ट लाईक इट’, ‘अ‍ॅज यू लाईक इट’, ‘ए मिडसमर नाईट्स ड्रीम’, ‘आम्र्स अँड द मॅन’ या नाटकांतून तिने भूमिका केल्या आहेत. असून ‘जाल’, ‘ऑल इन द टायमिंग’, ‘रे-ले’, ‘ड्रीम कॅचर’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. नाटय़धर्मी पुरस्कार स्वीकारल्यानंतर फैजे तिच्या सध्या गाजत असलेल्या ‘शिखंडी-द स्टोरी ऑफ इन बिटवीन्स’ या नाटकातील एक प्रसंग सादर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 2:46 am

Web Title: satish alekar get tanvir award
Next Stories
1 आयुक्त कुणाल कुमार यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार, खासदार काकडेंचा इशारा
2 चाकणमध्ये बनावट आधारकार्ड तयार करणारे रॅकेट उद्धवस्त; चौघांना अटक
3 शिरुरमध्ये कारच्या धडकेत दुकाचाकीस्वाराचा मृत्यू
Just Now!
X