औरंगाबाद येथील स्वा. सावरकरप्रेमी मित्र मंडळ आणि आंतरराष्ट्रीय पूर्णवादी युवा फोरम यांच्यातर्फे सिंगापूर येथे ९ नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशातून २००८ पासून हे संमेलन घेण्यात येत आहे. यापूर्वी औरंगाबाद, अंदमान, मॉरिशस, श्रीलंका, दुबई आणि लंडन येथे हे संमेलन झाले होते. या संमेलनाचे औचित्य साधून सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड असा ११ दिवसांच्या पर्यटनाची संधी संमेलनातील सहभागींना मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९८२३२६७१०० किंवा ९३७३२६७१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.