‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ िदडीचा शुभारंभ

निसर्ग आणि पर्यावरणाचे नाते वैश्विक आहे. समृद्ध पर्यावरणासाठी आणि मानवी मनावर चांगले संस्कार होण्यासाठी पर्यावरण रक्षणाचा संदेश वारकऱ्यांनी राज्यभर पोहोचवावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी केले.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

राज्याचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या िदडीचा शुभारंभ बापट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. महापौर प्रशांत जगताप यांनी वारीसोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या वाहनाची फीत कापून उद्घाटन केले आणि हे वाहन मार्गस्थ झाले. ज्ञानेश्वरमहाराज वाबळे, शाहीर देवानंद माळी, संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या चंदाबाई तिवाडी, वनराई अध्यक्ष रवींद्र धारिया, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य पुंडलिक मिराशे, प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत ढोके उपस्थित होते.बापट म्हणाले,की प्रदूषणाची समस्या जगभर भेडसावत आहे.

बापट म्हणाले,की प्रदूषणाची समस्या जगभर भेडसावत आहे. पर्यावरण रक्षणासंदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे. समाजप्रबोधन आणि आध्यात्मिक प्रबोधनाद्वारे पर्यावरण संतुलनाचा संदेश राज्यातील लाखो वारकरी पंढरीच्या वारीमध्ये देत आहेत. पर्यावरण आणि वृक्षारोपणाद्वारे मानवी मनावर संस्कार होतो. त्यामुळे येत्या वनमहोत्सवात जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवावीत. िदडीमध्ये सहभाग घेणाऱ्या वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर पर्यावरणपूरक काव्य आणि ओव्यांचे गायन केले. बापट यांच्या हस्ते ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार मिळाल्याबद्दल रवींद्र धारिया यांचा सत्कार करण्यात आला. वारी मार्गावर मोठय़ा प्रमाणात वृक्षांची लागवड करण्याचे मिराशे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.