बहुपर्यायी आणि ऑनलाइन परीक्षेचा परिणाम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्ष परीक्षांच्या निकालात जवळपास २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाइन परीक्षा, प्रश्नपत्रिकांची कमी के लेली काठिण्यपातळी अशा कारणांमुळे परीक्षांचे निकाल वाढल्याचे दिसून येत आहे.

करोना संसर्गामुळे विद्यापीठाने १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेतली. या परीक्षांदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या. मात्र त्यावर मार्ग काढत विद्यापीठाने परीक्षा घेतल्या. विद्यापीठाने नियोजनानुसार निकाल जाहीर करण्यास सुरुवात के ली आहे. आतापर्यंत काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रमांचे निकाल शंभर टक्के  लागले आहेत. पुढील काही दिवसांत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, की आतापर्यंत २१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. दरवर्षी अभ्यासक्रमनिहाय निकालाची टक्के वारी वेगवेगळी असते. मात्र यंदा निकालात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही अभ्यासक्रमांचे निकाल १०० टक्के  लागले आहेत. आता उर्वरित सर्व निकाल १२ नोव्हेंबपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नसंच उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप कळण्यास मदत झाली. तसेच परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळाल्याने निकाल वाढला आहे, असेही त्यांनी नमूद के ले.

फेरपरीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ

ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यासाठी विद्यापीठाने ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान फे रपरीक्षा घेतली. मात्र या फे रपरीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत असून, तिन्ही दिवसांत मिळून जेमतेम ५० टक्के च विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. डॉ. काकडे म्हणाले, की परीक्षेसाठी तीन दिवसांत जवळपास २८ हजार विद्यार्थी अपेक्षित होते. त्यापैकी जवळपास ५० टक्के  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर फे रपरीक्षेसाठी नोंदणी नसलेल्या सुमारे सहाशे विद्यार्थ्यांना आयत्यावेळी परीक्षेची संधी देण्यात आली.

करोना संसर्गाच्या काळात परीक्षा स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ मिळाला. तसेच ऑनलाइन परीक्षेमध्ये साठ प्रश्नांपैकी कोणतेही पन्नास प्रश्न सोडवायचे होते आणि नकारात्मक गुणांची पद्धत नव्हती. परीक्षेसाठीचे नमुना प्रश्न परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरुप कळण्यास मदत झाली. या सगळ्या कारणांमुळे निकालात वाढ झालेली असू शकते.

– डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा