क्युएस क्रमवारीत ६५१ ते ७०० स्थानी

पुणे : क्वॉक्वे रेली सायमंड्स (क्युएस) या संस्थेने २०२१ साठी जाहीर के लेल्या वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिं ग या क्रमवारीत सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ या एकमेव राज्य विद्यापीठाला या क्रमवारीत स्थान मिळवता आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाने कामगिरीत सुधारणा के ली आहे. मात्र या क्रमवारीत देशातील उच्च शिक्षण संस्थांची पीछेहाट झाली आहे.

जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात क्युएस क्रमवारी प्रतिष्ठेची मानली जाते. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक-आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या अशा विविध निकषांवर ही क्रमवारी तयार के ली जाते. त्यामुळे या क्रमवारीकडे जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे लक्ष असते. वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिं गमध्ये जगातील १ हजार २९ संस्थांचा समावेश आहे. त्यात पहिल्या स्थानी अमेरिके तील मॅसाच्युसेच्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ दुसऱ्या, हार्वर्ड विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. देशातील एकाही उच्च शिक्षण संस्थेला पहिल्या शंभर संस्थांत स्थान मिळवता आले नाही.

जागतिक क्रमवारीत सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ आणि बंगालमधील जादवपूर विद्यापीठ ६५१ ते ७०० या स्थानी आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाची कामगिरी उंचावली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मणिपाल अ‍ॅकॅ डमी, जामिया मिलिया ७५१ ते ८०० या स्थानी, तर बनारस हिंदू विद्यापीठ, अण्णा विद्यापीठ, अम्रिता विश्व विद्यापीठम, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ ही विद्यापीठे ८०१ ते १००० या स्थानी आहेत.

देशातील राज्य विद्यापीठांपैकी के वळ जादवपूर विद्यापीठ आणि सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ या दोनच विद्यापीठांना या क्रमवारीत स्थान मिळाले. विद्यापीठाचे क्रमवारीतील स्थान जवळपास दोनशे स्थानांनी उंचावले आहे. देशातील आयआयटी, केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करून जागतिक स्तरावरील क्रमवारीत विद्यापीठाने कामगिरी उंचावत स्थान मिळवणे ही आनंदाची बाब आहे.

डॉ. नितीन करमळकर, कु लगुरू, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ

देशातील तीन संस्थांना पहिल्या दोनशे संस्थांत स्थान

आयआयटी मुंबई, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स आणि आयआयटी दिल्ली या देशातील तीनच संस्थांनी जगातील पहिल्या दोनशे संस्थांमध्ये स्थान प्राप्त के ले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील १४ उच्च शिक्षण संस्थांचे स्थान घसरले आहे, तर चार उच्च शिक्षण संस्थांनी क्रमवारीत सुधारणा के ली आहे.