अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रांतामध्ये देश-परदेशात प्रतिष्ठेचा असलेला सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यंदा ११ ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे बुधवारी यंदाच्या महोत्सवाच्या तारखांची घोषणा करण्यात आली. गायन, वादन आणि नृत्य असा त्रिवेणी संगम असलेला हा महोत्सव न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या पटांगणावर चार दिवस आणि पाच सत्रांमध्ये रंगणार आहे. या महोत्सवाचे यंदा ६२ वे वर्ष आहे. या महोत्सवातील कलाकारांची नावे आणि अन्य तपशील पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनवास जोशी यांनी कळविले आहे.