11 August 2020

News Flash

करोना साहित्य खरेदीत गैरव्यवहार

चंद्रकांत पाटील यांचा आरोप

संग्रहीत छायाचित्र

चंद्रकांत पाटील यांचा आरोप

पुणे : करोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची आणि साधनांची खरेदी करताना राज्य सरकारकडून गैरव्यवहार होत आहे. होमिओपॅथिकच्या गोळ्यांची डबी दोन रुपयांना मिळत असताना ती २३ रुपयांना खरेदी करण्यात आली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी के ला.

चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते. करोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षावर के ल्या जाणाऱ्या खर्चावरून त्यांनी सरकारवर टीका के ली.

वांद्रे येथे २७ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या कक्षात समुद्राचे पाणी येत आहे. गोरेगाव येथील वस्तू दुप्पट संख्येने खरेदी करण्यात आल्या आहेत. होमिओपॅथिकची दोन रुपयांना मिळणारी डबी २३ रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. हे पहाता सरकारचे काय चालले आहे, असा प्रश्न पडत आहे, असे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, वांद्रे येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला कक्षासमोर रिलायन्स कं पनीचा हॉल आहे. तेथे रुग्णांवर उपचार करता आले असते. तीन हजार खाटांची सुविधाही येथे करता आली असती. मात्र त्याऐवजी २७ कोटी रुपये खर्च करून कक्ष उभारण्यात आला. करोना संकटाच्या काळात राज्यात समान कार्यक्रम राबविला जात नाही. प्रत्येक जिल्ह्य़ात वेगवेगळे निर्णय होत आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. त्यासाठी राज्याच्या नेतृत्वाने योग्य वेळी योग्य भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. करोना संकट काळात राज्य सरकार तिजोरीतील निधीला हात लावत  नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:59 am

Web Title: scam in the purchase of corona items says chandrakant patil zws 70
Next Stories
1 आठवडय़ात राज्यभर मुसळधार?
2 अभिजात गायकीच्या सुरांशी संवाद
3 रेल्वे बंदमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात
Just Now!
X