विश्रामबाग पोलिसांकडून आरोपीला बारा तासांत अटक

शाळकरी मुलीची रस्त्यात छेड काढल्यानंतर संबंधित मुलीने चप्पलने मारल्याच्या रागातून तिच्यावर भररस्त्यात कटरने वार केल्याच्या प्रकरणात पंचेचाळीस वर्षे वयाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीवर वार करण्याची घटना बुधवारी घडली होती. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीला बारा तासातच जेरबंद केले.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध

देवदास भीमप्पा मरटी (वय ४५) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी १७ ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास मंडईतील रामेश्वर हॉटेलजवळून मैत्रिणीसमवेत शाळेला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला.

तिच्याकडे पाहून शिट्टय़ा वाजवून तिची छेड काढली. त्यानंतर तो पळून जात असताना मुलीने त्याचा पाठलाग केला. मंडईतील भाजीमार्केटमध्ये मुलीने त्याला गाठले. त्या ठिकाणी तिने त्याला चप्पलने मारहाण केली.

संबंधित मुलगी १९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता गोपाळ हायस्कूलजवळ चिमण्या गणपती चौक येथे आली असता तिने केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून आरोपी मरटी याने पाठीमागून येत तिच्यावर कटरने वार केले.

त्यात तिच्या पोटावर व हातावर जखमा झाल्या. वार करून मरटी पळून गेला होता.

याप्रकरणी विश्रामबाग पोली ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यात आरोपीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. मात्र, त्यावरून तपास घेण्यात आला असता मरटी याचे नाव समोर आले. तो फिरस्ता असून, घटनेत वापरलेले कटर पोलिसांना त्याच्याकडे मिळाले.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट, निरीक्षक (गुन्हे) सुनील िपजण, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, हवालदार शरद वाकसे तसेच बाबा दांगडे, आनंद बाबर, संजय बनसोडे, धीरज पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.