दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परीक्षांच्या तोंडावर शिक्षक, कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचे शिंग फुंकले आहे. कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांकडून बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.

वर्षभर आश्वसनांमुळे थंडावलेल्या शिक्षक, कर्मचारी संघटना परीक्षांच्या तोंडावर आंदोलने सुरू करतात. यावर्षीही ही प्रथा कायम विनाअनुदानित शिक्षकांनी कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटेनेचे संपर्क प्रमुख अजित इथापे यांनी दिली आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा यांसह निकालाच्या कामावरही बहिष्कार टाकण्यात येईल, असे आंदोलनकर्त्यांनी या वेळी सांगितले.