दुकानांसमोर पालकांच्या रांगा
शाळा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असून शालेय साहित्याच्या खरेदीसाठी रविवारी पालकांनी गर्दी केली होती. शालेय साहित्याची बाजारपेठ असलेल्या अप्पा बळवंत चौकातील रस्ते गर्दीने भरून गेले होते. यावर्षीही शालेय साहित्याच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.
राज्यातील शाळा बुधवारी (१५ जून) सुरू होत आहेत. काही खासगी शाळा सोमवारपासूनच (१३ जून) सुरू होत आहेत. शाळा सुरू होण्याआधीचा पालकांच्या सुटीचा शेवटचा दिवस असल्यामुळे शालेय साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ भरून गेली होती. गर्दीमुळे शालेय साहित्याची बाजारपेठ असलेल्या अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रस्ता या ठिकाणी सायंकाळी वाहतूकही खोळंबली होती.
पुस्तके, वह्य़ा, दप्तर, गणवेश, शाळेचे बूट यांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी झाली होती. काही दुकानांच्या बाहेरही खरेदीसाठी पालकांच्या रांगा लागल्या होत्या. गणवेशाच्या खरेदीसाठी विशिष्ट दुकानांचीच नावे शाळा सांगत असल्यामुळे या दुकानांमध्ये अधिक गर्दी होती. वह्य़ा, पुस्तकांच्या दुकानांबरोबरच विविध संघटना आणि संस्थांनी उभारलेल्या विक्री केंद्रांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला. लहान मुलांच्या दप्तरांमध्ये यावर्षीही छोटा भीम भाव खाऊन आहे. त्याच्या जोडीला मोटू आणि पतलूची चित्रे असलेली दप्तरेही लहान मुलांसाठी आकर्षण ठरली आहेत. यावर्षीही शालेय साहित्याच्या किमतींमध्ये १० ते १५ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. गणवेश, दप्तरे यांचे दर वाढले आहेत. सहावीच्या नव्या पुस्तकांच्या आणि वह्य़ांच्या किमतीही थोडय़ा वाढल्या आहेत.

ऑनलाइन बाजारपेठेचीही स्पर्धा
शालेय साहित्याच्या खरेदीत पारंपरिक बाजारपेठेला ऑनलाईन बाजारपेठेशी स्पर्धा करावी लागत आहे. सर्व इयत्तांच्या पुस्तकांपासून ते दप्तर आणि इतर साहित्य विविध वस्तू विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ओएलक्स, क्विकरसारख्या छोटय़ा जाहिरातींच्या संकेतस्थळांवर वापरलेल्या आणि नव्या शाळेच्या गणवेशांच्या जाहिराती झळकत आहेत. मात्र अद्याप गणवेश आणि पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांकडून पारंपरिक बाजारपेठेलाच प्राधान्य देण्यात येत आहे.

A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
unseasonal rain in maharashtra
राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’