26 November 2020

News Flash

पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंदच राहणार-महापौर

पुढील निर्णय करोनाची स्थिती पाहून घेतला जाणार

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातले आदेश दिले आहे. १३ डिसेंबरला पुण्यातली करोनाची स्थिती पाहणार त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणार. पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत असंही स्पष्ट केले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना संसर्ग आणखी वाढू नये म्हणून १३ डिसेंबरपर्यंत पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. मुंबईतही करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातल्याही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पुण्यातल्या शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा संसर्ग वाढवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अनलॉक सुरु झाल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसू लागली. तसंच दिवाळीच्या आधीही बाजारांमध्ये गर्दी झाली होती. यामुळे करोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता आहे. अशात ही लाट येऊन संसर्ग वाढू नये म्हणून तूर्तास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी असलेल्या शाळा बंद राहणार आहेत. २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याचे आदेश सरकारने दिले असले तरीही स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असंही या आदेशांमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या तीन प्रमुख शहरांमधल्या शाळा बंद असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 5:47 pm

Web Title: schools in pune will remain closed till december 13 scj 81 svk 88
Next Stories
1 खळबळजनक! मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
2 “मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर सुपुत्राला बार आणि पबची”
3 … त्यावेळी अमित शाहंच्या सांगण्यावरून मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती : चंद्रकांत पाटील
Just Now!
X