दैनिक ‘लोकसत्ता’ने गेल्या गणेशोत्सवात ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या सदराअंतर्गत पाबळ येथील विज्ञान आश्रमाची माहिती दिल्यानंतर आश्रमाला वाचकांकडून मोठय़ा प्रमाणात देणगी मिळाली होती. त्या देणगीतून आश्रमामधील स्वयंपाकघर आणि कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन येत्या गुरुवारी (३० जुलै) केले जाणार आहे. या कर्यक्रमाला सर्व देणगीदारांनी आणि ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आश्रमातर्फे करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्य़ात पाबळ येथे हा विज्ञान आश्रम आहे. तेथे मुलांना विविध कौशल्ये शिकवली जातात. त्यासाठी आठवी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांनी काम करत करत ही कौशल्ये शिकायची असतात. या संस्थेबाबत गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु’ अंतर्गत माहिती देण्यात आली होती. त्यावरून आश्रमाला वाचकांनी प्रचंड पाठिंबा दिला. त्या निधीतून स्वयंपाकघराच्या इमारतीचे सुमारे १६०० चौरस फुटांचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीत पर्जन्यजल संचय, सौर दिवे यांची व्यवस्था आहे. या स्वयंपाकघरात दररोज किमान ६० व्यक्तींच्या तीनही वेळच्या भोजनाची सोय आहे. तेथे स्वयंपाक घरातील सांडपाण्याच्या पुनर्वापराची व्यवस्था, स्वयंपाकासाठी निर्धूर चूल, कमी ऊर्जेवर चालणाऱ्या शेगडय़ा, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, किचन मधील डायिनग टेबल इत्यादी सोयी आहेत. या सर्व गोष्टींच्या निर्मितीत आश्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या इमारतीचे औपचारिक उद्घाटन विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. एस. एस. कलबाग यांचा स्मृतिदिनानिमित्त येत्या गुरुवारी (३० जुलै) करण्यात येणार आहे. त्या निमित्त पाबळ (ता. शिरूर, जि. पुणे) येथील विज्ञान आश्रमात मागील वर्षी केलेल्या लेझर कटिंग मशीन, डी िपट्रर, फॅब अॅकॅडमीअंतर्गत सुरू असलेले विविध प्रकल्प, भात मळणी (सोलणी) यंत्र, शेतीविषयक विविध प्रकल्प प्रदर्शित केले जाणार आहेत. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असेल. आश्रमात शिकून उद्योजक बनलेल्या विद्यार्थ्यांला याच दिवशी  ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती आश्रमाचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमाला येऊ इच्छिणाऱ्यांनी ९७३०००५०२५, ९७३०००५०३० किंवा ९३७०००५०१६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.