कुटुंबातील प्रत्येकासाठी पौष्टिक आहाराची सूत्रे आखून देणारा ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा वार्षिकांक गेल्या पाच वर्षांत वाचकप्रिय बनला आहे. रूचकर आणि पौष्टिक आहाराचा मंत्र सांगणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकात यंदा किनारी क्षेत्रांमधील समृद्ध पाककृतींची ओळख करून देण्यात आली आहे. या खास अंकाचे प्रकाशन मंगळवारी (२७ ऑगस्ट) एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात होणार आहे.

सागरकिनारा लाभलेल्या पूर्व आणि पश्चिम भागात वसलेल्या भारतातील विविध राज्यांनी सागरी संपत्तीचा उपयोग करून वैशिष्टय़पूर्ण खाद्यसंस्कृती विकसित केली आहे. सागरी किनारा म्हटल्यानंतर तेथील आहारामध्ये विविध प्रकारच्या मासळीने  समृद्ध तसेच भात आणि नारळ हे घटकही तितकेच महत्त्वाचे ठरतात. या घटकांचा वापर मुख्यत्वे असला, तरी प्रत्येक राज्यातील आणि प्रत्येक सुगरणीने बनविलेल्या पदार्थाची लज्जत मात्र वेगवेगळी असते.

हीच वैविध्यपूर्ण खासियत या विशेषांकात वाचायला मिळणार आहे. सागरी किनारा लाभलेल्या नऊ  राज्यांतील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी आपापल्या राज्यातील महत्त्वाच्या पदार्थाची वैशिष्टय़े आणि हे पदार्थ बनविण्याची कृती या विशेषांकात करून दिली आहे.

खास आकर्षण..

* ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगाल या राज्यांच्या खाद्यसंस्कृतीत काय दडले आहे, याची इत्थंभूत माहिती.

*  प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा प्रकाशन सोहळा आणि या दोघांशी गप्पा

* प्रायोजक – तन्वी हर्बल

*  सहप्रायोजक – श्री धूतपापेश्वर

*  बँकिंग पार्टनर – अपना बँक

*  पॉवर्ड बाय- किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंद कुमार

*  हेल्थकेअर पार्टनर- होरायझन हॉस्पिटल

प्रकाशन सोहळा

केव्हा

२७ ऑगस्ट

कधी

सायंकाळी ५.४५

कुठे

महाराष्ट्र एज्युकेशन

सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर शाळेचे सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड