28 February 2021

News Flash

कोंढव्याची पुनरावृत्ती; संरक्षक भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू

यांत ६ पुरुष व ३ महिला आहेत.

शनिवारी पुण्यातील कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून दूर्घटना घडली होती. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा आंबेगांव सिंहगडमध्ये घडला आहे. येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यृ झाला आहे. दुर्घटनेत राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२) आणि जेटू चंदन रवते अशी मृतांची आत्तापर्यंत समजलेली नावं आहेत. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

 

शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा दुसरी दुर्घटना घडून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ठार झालेले मजूर छत्तीसगढचे रहिवासी आहेत असेही समजते आहे.

शनिवारी घडलेल्या घटनेनंतर बिल्डर्सना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी काय कारवाई होणार? आणि असे किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 5:14 am

Web Title: security wall collapses in pune mpg 94
Next Stories
1 संततधार पावसामुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी
2 कोंढवा दुर्घटनाप्रकरणी आठ दिवसांत अहवाल तयार होणार
3 पुण्याच्या नेहा नारखेडे यांचा ‘फोर्ब्स’च्या यादीत समावेश
Just Now!
X