महिला सबलीकरण, महिलांमधील जागृती आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शहरात अडोतीस ठिकाणी प्रशिक्षण वर्ग सुरू होत असून महापौर चंचला कोद्रे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे वर्ग नि:शुल्क असून त्यासाठीचा खर्च महापौरांतर्फे केला जाणार आहे.
महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला व युवतींना प्रशिक्षित करण्याची गरज असून त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करत असल्याचे महापौरांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. महिलांसाठी असलेले कायदे, पोलिसांतर्फे केली जाणारी मदत, स्वसंरक्षण, महिलांचे आरोग्य आदी अनेक विषयांवर वर्गात मार्गदर्शन केले जाणार आहे. शहरातील अडोतीस ठिकाणी १ ते ७ डिसेंबर दरम्यान हे वर्ग चालतील. वर्गाची वेळ सायंकाळची असून सहभागी होणाऱ्या महिला व युवतींना रोज एक तास उपस्थित राहावे लागेल. वर्ग नि:शुल्क असून त्यासाठीचा सर्व खर्च महापौरांतर्फे केला जाणार आहे.
प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. विविध विभागांसाठीचे मार्गदर्शक व त्यांचे मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. मध्य पुणे परिसर व पेठांचा भाग- जितेंद्र यादव- ९०९६२४२८८२, रुबीना शेख- ८६००१०९९७३, लालचंद परदेशी- ९८९०७८७५७६, कात्रज परिसर- शरद झोके- ९४०४०६१३१३, कोथरूड परिसर- सचिन महाजन- ९४२३०१४६०३, वारजे व परिसर- अश्विनी काळे- ९७६७२४४२००, मार्केट यार्ड आणि सिंहगड रस्ता परिसर- रोहित खंडागळे- ९६०४५१५२३६, हडपसर परिसर- हेमंत कोकाटे- ७३८५९३७२३२, सहकारनगर- अवधूत शिरोळे- ९८९०३८०४७७.