मन्या सुर्वे हा माझा भाऊ आहे. मला अस वाटतं की मी तसा होऊ नये यासाठी आई मला गावाला घेऊन गेली असे वक्तव्य जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. ते कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येने नानांचे चाहते उपस्थित होते. समीरन वाळवेकर यांनी नानांची मुलाखत घेतली. तेव्हा अनेक विषयांवर त्यांनी आपली मतं मांडली.

cried for coming late to school blamed mother
शाळेत उशीरा येण्याचं चिमुकल्यानं सांगितलं भन्नाट कारण; VIDEO पाहून पोट धरुन हसाल…
Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

नाना यांनी सुरुवातीच्या काळात गुन्हेगारी भूमिका केल्या आहेत असा प्रश्न करत एक चित्रफीत दाखवण्यात आली. यानंतर जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गुन्हेगारीवर बोलत असताना अनेक गोष्टींचा उलगडा केला. नाना म्हणाले की, “गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मामा. त्यांची मुलंही तशी होती. त्यांच्यापासून लांब राहावं म्हणून आई मुरुडला गावी घेऊन गेली,” असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना तुम्ही प्रत्यक्षात मोठ्या गुन्हेगाराला बघितलंय किंवा भेटलात का? असा सवाल करण्यात आला. यावर मन्या सुर्वे असं त्यांनी उत्तर दिलं. मन्या सुर्वे हा माझा भाऊ आहे. माझ्या मामाचा तो मुलगा असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “मला अस वाटतं की मी तसा होऊ नये यासाठी आई मला गावाला घेऊन गेली. कुठेतरी सुप्त असतंच. गुंड हे शांत असतात. व्हायलन्स हा ओरडत नाही. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो. पण सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर गोंधळ असतो. तो सगळा विचार करू शकतो,” असंही ही नाना म्हणाले.