पुणे : गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रातील योगदानासाठी जगभरात ओळख निर्माण के लेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मानाभन (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. डॉ. पद्मानाभन आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी  केंद्रात (आयुका) मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी वासंती, कन्या हंसा असा परिवार आहे. डॉ. पद्मानाभन यांच्यावर औंध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

केरळ विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन के ल्यानंतर पद्मानाभन मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेशी (टीआयएफआर) जोडले गेले. त्यानंतर त्यांनी टीआयएफआरमध्येच १९८० पासून अध्यापन सुरू के ले. १९८० ते १९९२ या कालावधीत त्यांनी संस्थेतील विविध पदांवर काम के ले. तर केंब्रिज येथील खगोलशास्त्र संस्थेतही वर्षभर काम के ले. १९९२ मध्ये ते आयुकामध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाले. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र अशा क्षेत्रांत त्यांनी के लेले संशोधन जगभरात महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. पद्मानाभन यांनी ‘नोशन ऑफ कॉस्मिक इन्फॉर्मेशन’ ही नवी संकल्पना मांडली.  खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधन कार्याचा २००७ मध्ये पद्माश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याशिवाय त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, इन्फोसिस सायन्स फाउंडेशन पुरस्कार असे विज्ञान क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते.

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
oil companies latest marathi news
तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?

डॉ. पद्मानाभन यांचे भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र विषयांतील तीनेशहून अधिक शोधनिबंध नामांकित संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले होते. तसेच पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसह आफ्टर द फस्र्ट थ्री मिनिट्स : द स्टोरी ऑफ अवर युनिव्हर्स, स्ट्रक्टरल इन्फॉर्मेशन इन युनिव्हर्स, अ‍ॅन इन्व्हिटेशन टू अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अशा अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी के ले.

प्रा. टी. पद्मानाभन यांनी सापेक्षतावाद, थर्मोडायनॅमिक्स अशा क्षेत्रात त्यांनी के लेले संशोधन जगभरात मान्यता पावले आहे. ते अभ्यासक, संवादक, उच्च दर्जाचे संशोधक होते. त्यांच्या निधनाने खगोलशास्त्र संशोधनामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. – डॉ. के . विजयराघवन, मुख्य वैज्ञानिक सल्लागार

प्रा. टी. पद्मानाभन यांचे निधन हा आयुकाच्या इतिहासातील आणि भारतीय वैज्ञानिक समुदायासाठी सर्वांत दु:खद दिवस आहे. त्यांनी संशोधनाचा वारसा आणि पाठ्यपुस्तके  मागे ठेवली आहेत. – डॉ. सोमक रायचौधुरी, संचालक, आयुका