News Flash

ज्येष्ठ इतिहास संशोधक प्र.रा.अहिरराव यांचे निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रतापराव रामराव उर्फ प्र. रा.अहिरराव (वय ७४) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने काळेवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे

| March 14, 2013 01:59 am

ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रतापराव रामराव उर्फ प्र. रा.अहिरराव (वय ७४) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने काळेवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे असा परिवार आहे. डॉ. श्याम अहिरराव व सेवाविकास बँकेचे संचालक शेखर अहिरराव यांचे ते वडील होत. िपपरी गावातील स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता अंत्यविधी होणार आहे.
इतिहास व प्राचीन मंदिरांचे गाढे अभ्यासक म्हणून अहिरराव यांची ओळख होती. त्यांनी देशभरातील विविध भागांतून जुन्या गणेश मूर्तीचे संकलन केले होते. ‘लोकसत्ता’ च्या िपपरी-चिंचवड अंतरंग पुरवणीसाठी त्यांनी प्रदीर्घ काळ लिखाण केले होते. िपपरी पालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त शहराच्या प्रवासावर आधारित लेख व छायाचित्रांचा समावेश असलेली ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ ही स्मरणिका त्यांनी काढली होती. अहिरराव यांच्या निधनाचे वृत्त समजताच खासदार गजानन बाबर व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 1:59 am

Web Title: senior history researcher p r ahirrao passed away
Next Stories
1 आधार कार्ड नोंदणीची केंद्रं दहा दिवसांत वाढवणार – जोशी
2 भयप्रद अवस्थेमुळे साहित्य व वृत्तपत्रक्षेत्राचा संकोच- कोत्तापल्ले
3 कोत्तापल्ले यांनी साधला नेमाडेंवर नेम!
Just Now!
X