News Flash

ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, ‘प्रभात’चे माजी संपादक आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव गंगाधर खंडकर (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी सकाळी निधन झाले.

| October 28, 2013 02:37 am

ज्येष्ठ पत्रकार, ‘प्रभात’चे माजी संपादक आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव गंगाधर खंडकर (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आहेत.
कोकणातून पुण्यामध्ये आलेल्या खंडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिपाई म्हणून काम करीत शिक्षण पूर्ण केले. प्रभातचे संस्थापक कै. वा. रा. कोठारी यांनी त्यांची चिकाटी आणि सामाजिक तळमळ पाहून त्यांना पत्रकारितेची संधी दिली. ५५ वर्षे पत्रकारितेमध्ये असलेले खंडकर हे ३५ वर्षे प्रभातचे संपादक होते. सामाजिक कार्याशी पत्रकारितेची नाळ जोडणारा संपादक अशी त्यांची ख्याती होती. पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील समस्या आणि गावकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांनी तब्बल ४०० गावांना भेटी दिल्या, एक गाव एक पाणवठा, एक गाव एक स्मशान ही चळवळ त्यांनी गावोगाव रुजविली. संपादकपदावर असताना कार्यालयीन कामकाजामध्ये त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. रंगतरंग आणि चौकातली चर्चा ही त्यांची सदरे अनेक वर्षे दैनंदिन स्वरूपात प्रसिद्ध होत असत.
माधवराव खंडकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, शिवसेना संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, रमेश बागवे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील अनेक जण या वेळी उपस्थित होते. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे बुधवारी (३० ऑक्टोबर) पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये खंडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 2:37 am

Web Title: senior journalist madhavrao khandkar passed away
Next Stories
1 पवना बंद नळयोजना सुरू न झाल्यास केंद्राचा निधी परत करावा लागेल – मुख्यमंत्री
2 कविता म्हणजे आरसाच – संदीप खरे
3 नामबदल.. नव्हे, नामविस्ताराचे नाटय़
Just Now!
X