14 October 2019

News Flash

पुण्यात शाळेच्या मैदानावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

संबंधीत संशयास्पद वस्तू ताब्यात घेण्यात आली असून त्याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या एअर फोर्स शाळेच्या मैदानावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही वस्तू नक्की काय आहे याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. या घटनेचा तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, लोहगाव परिसरात असलेल्या एअर फोर्स शाळेच्या मैदानावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुले खेळत होती. दरम्यान मैदानावर बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे विद्यार्थ्यानी शिक्षकांना सांगितले. त्यानंतर तातडीने शिक्षकांनी याबाबत पोलिसांना कळवले. याची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस आणि बीडीडीएस दाखल झाल्यानंतर संबंधीत संशयास्पद वस्तू ताब्यात घेण्यात आली असून त्याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on May 14, 2019 5:16 pm

Web Title: sensation caused by bomb like material found at the school ground in pune