पुणे : पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी, रस्त्यांच्या दुरवस्थेबरोबरच रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे.  त्यासाठी महापालिके च्या पथ विभागाने चोवीस तास कार्यरत राहणारा स्वतंत्र कक्ष स्थापन के ला आहे. नागरिकांच्या तक्रारीची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना या पथकातील कर्मचाऱ्यांना करण्यात आली आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे, रस्त्यावरील खराब भाग तातडीने दुरुस्त करणे, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजविणे, अशी कामे या स्वतंत्र कक्षातील कर्मचाऱ्यांकडून होणार असल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता विजयकु मार शिंदे यांनी दिली. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ०२०-२५५०१०८३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पथ विभागाकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात दरवर्षी रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना घडतात. जोरदार पावसाने प्रमुख रस्त्यांसह उपरस्त्यांवर खड्डेही पडतात. पाणीपुरवठा, पथ विभाग आणि मल:निस्सारण विभागाकडून पावसाळापूर्व कामांअंतर्गत तसेच सेवा वाहिन्या टाकण्यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात मोठय़ा प्रमाणावर रस्ते खोदाईची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरुवस्था झाल्याचे चित्र आहे. रस्ते दुरुस्तीची कामे महापालिके ने हाती घेतली असली तरी कामे संथगतीने सुरू आहेत. अशास्त्रीय पद्धतीने रस्ते दुरुस्ती होत असल्याने पावसाळ्यात रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था होण्याची भीती आहे. महापालिके च्या स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असला तरी पावसाळ्यात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतील जाणार की के वळ तात्पुरती मलमपट्टी होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.