सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ ची माहिती

पुणे : कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती सिरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे लस निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र आहे.

सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे  प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे  (आयसीएमआर) देशातील १५ के ंद्रांवर कोव्हीशिल्ड लशीच्या चाचण्या करण्यात येत आहेत. भविष्यात कोव्होव्हॅक्स या अमेरिकास्थित नोव्हाव्हॅक्सच्या वैद्यकीय विकसनासाठी सिरम आणि आयसीएमआर एकत्र आले आहेत. कोव्हीशिल्ड लशीचे डोस ज्या स्वयंसेवकांना देण्यात आले आहेत, त्यांच्यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम (साईड इफे क्ट) दिसले नसल्यामुळे या चाचण्यांबाबत समाधानकारक असल्याची भावनाही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सिरम इन्स्टिटय़ुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, करोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढय़ामध्ये आयसीएमआरचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. करोना प्रतिबंधासाठी गुणकारी लस विकसित करण्याच्या मोहिमेत भारताला अग्रभागी ठेवण्यासाठी सिरम आणि आयसीएमआर यांच्यातील भागीदारीने महत्वाची भूमिका निभावल्याचेही पूनावाला यांनी स्पष्ट के ले. सार्वजनिक आरोग्य सेवा आंतर्बाह्य़ परिपूर्ण करण्यासाठी करोनाने मोठी संधी दिल्याचेही पूनावाला यांनी यावेळी म्हटले आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, लसीची निर्मिती आणि उत्पादनाच्या बाबत भारत सध्या जगामध्ये अग्रक्रमावर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याला मिळालेली प्रयत्नांची जोड या बळावर सिरमने आपल्या क्षमता सिद्ध के ल्या आहेत, असेही डॉ. भार्गव यांनी यावेळी स्पष्ट के ले.

देशातील १५ के ंद्रांवर तब्बल १६०० स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून, त्यांपैकी बहुसंख्य स्वयंसेवकांना तिसऱ्या टप्प्यातील दुसरा डोसही टोचण्यात आल्या आहेत.