पुणे : वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) २६ सप्टेंबरला होणार आहे. परीक्षेसाठी १७ मे ते १० जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील.

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे  (यूजीसी) महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठातर्फे  घेण्यात येते. आतापर्यंत ३६ वेळा सेट परीक्षा घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. आता विद्यापीठाकडून ३७ व्या सेट परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. २६ सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकू ण १५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयीची अधिक माहिती  ttp://setexam.unipune. ac.in या संके तस्थळावर देण्यात आली असल्याचे विद्यापीठाचे कु लसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार यांनी सांगितले.