News Flash

पुण्यातील लोहियानगर भागातील एका कारखान्यासह सात घरांना भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील लोहियानगर येथील मुख्य अग्नीशमन केंद्र समोरील वसाहतीमधील एका कारखान्यासह सात घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहियानगर येथील अग्नीशमन केंद्रासमोरील वसाहतीमध्ये पुठ्ठा तयार करणार्‍या एका कारखान्यासह सात घरांना आज रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना अग्नीशमन केंद्रा समोरील बाजूस घडली. घटनेची माहिती मिळताच काही मिनिटात अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसून आग कोणत्या कारणांमुळे लागली हे अद्याप सांगता येणार नाही असे अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 11:31 pm

Web Title: seven houses including a factory caught fire in lohianagar area of pune abn 97 svk 88
Next Stories
1 धक्कादायक : पुण्यात आईच्या कुशीतून एका वर्षाच्या बाळाचे अपहरण
2 पुण्यात २४ तासात आढळले २०६ नवे करोना रुग्ण तर पिंपरीत १६६ नवे रुग्ण
3 “त्या’ घटनेनंतर आता राज्यपालदेखील पहाटे…”- जयंत पाटील
Just Now!
X