News Flash

राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून सात जणांनी ५० लाखांची दारु पळवली

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून ५० लाखांच्या दारूसह कार्यालयात आणला होता

(संग्रहित छायाचित्र)

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अडवून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून ५० लाखांची दारू जप्त करण्यात आली. मात्र, तळेगाव चाकण रोडवरील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून अधिकाऱ्यांना दमदाटी करून ५० लाखांची दारू सात जणांच्या टोळक्याने कंटेनरसह पळवून नेल्याचे घटना उघड झाली आहे. गुरुवारी पहाटे च्या सुमारास ही घटना घडली असून दुय्यम निरीक्षक योगेश नानाभाऊ फटांगरे यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादक शुल्क विभागाने २९ सप्टेंबर रोजी पुण्याहून मुंबई च्या दिशेने अवैध रित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर सोमटने फाटा येथे सापळा रचून कारवाई करण्यात आली होती. उत्पादन शुल्क विभागाने एक कंटेनर ताब्यात घेतला. अवैध दारुसह कंटेनर तळेगाव चाकण रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणले. १ ऑक्टोबर रोजी पहाटे एकच्या सुमारास आरोपी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकाला दमदाटी केली. शिवीगाळ आणि झटापट करून ५० लाखांची अवैध दारू आणि २० लाखांच्या कंटेनरसह पोबारा केला आहे. या  प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 9:37 pm

Web Title: seven persons snatched rs 50 lakh worth of liquor by assaulting officers in pimpri scj 81 kjp 91
Next Stories
1 देशात दडपशाही, अघोषित हुकमाशाही-अमोल कोल्हे
2 “मला वाटत ते रात्री कपडे घालूनच तयार असतात”; पाटलांच्या प्रश्नावर पवारांचा ‘फ्री हिट’
3 मी घेतलेली लस करोनाची नाही, तर… सिरमच्या लशीवर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण
Just Now!
X