News Flash

सातवीच्या मराठी पुस्तकात शिक्षकांची एकांकिका

सातवी आणि नववीची पुस्तके यंदा बदलणार आहेत.

गेल्या वर्षी आलेल्या सहावीच्या पुस्तकात विद्यार्थिनीच्या कवितेचा समावेश केल्यानंतर आता सातवीच्या मराठी पुस्तकात शिक्षकांना संधी देण्यात आली आहे. शिक्षकांनी लिहिलेल्या एकांकिकेचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

सातवी आणि नववीची पुस्तके यंदा बदलणार आहेत. गेल्या वर्षीपासून बालभारतीने पुस्तकांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांनाही संधी देण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी यवतमाळमधील विद्यार्थिनीची ‘झाड’ ही कविता सहावीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या वर्षी सातवीच्या पुस्तकांमध्ये शिक्षकांना लिहिण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी बालभारतीने शिक्षकांकडून एकांकिका मागवल्या होत्या. आलेल्या एकांकिकांचे अभ्यासमंडळातील सदस्यांनी वाचन करून त्यातील एका एकांकिकेची निवड केली. निवडण्यात आलेल्या एकांकिकेचा सातवीच्या मराठी पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणारी पुस्तकेही शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांना मिळणार आहेत. सातवीची पुस्तके बाजारात उपलब्ध झाल्यावर लगेचच नववीची पुस्तकेही दाखल होणार आहेत. सातवीची नवी पुस्तके आकर्षक, सचित्र करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना भाषेचे आकलन होण्याबरोबरच तिचा वापर करता यावा या दृष्टीने नव्या पुस्तकांची रचना करण्यात आली आहे. उपक्रमाच्या आधारे शिक्षणाची संकल्पना समोर ठेवून पुस्तकांची रचना करण्यात आली आहे. पुस्तकांवरील क्यू आर कोडमुळे पाठाशी संबंधित संकेतस्थळांचे संदर्भ, ई-साहित्यही उपलब्ध होऊ शकणार आहे.

सातवीची नवी पुस्तके तयार झाली असून त्यांचे राज्यभरातील विविध केंद्रांवर वितरणही सुरू झाले आहे. साधारण आठवडाभरात नवी पुस्तके बाजारातही उपलब्ध होऊ शकणार आहेत.  -डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 12:55 am

Web Title: seventh standard marathi book teachers one act play
Next Stories
1 ‘राम गणेश गडकरी आणि संभाजी महाराज यांचे पुतळे संभाजी बागेत बसवावेत’
2 राज ठाकरेंच्या कुंचल्यातून साकारलेली व्यंगचित्रे लवकरच फेसबुकवर
3 महाराष्ट्रातील पेट्रोल दरवाढीबाबत राज्याचे मंत्रीच अनभिज्ञ!