News Flash

पुण्यात सेक्स रॅकेट उदध्वस्त; उझबेकिस्तानच्या तरुणींसह पाच अटकेत

पुणे पोलीसांच्या समाजसेवा शाखेने कोथरुड परिसरात सुरू असलेले सेक्स रॅकेट गुरुवारी रात्री उदध्वस्त केले.

| October 11, 2013 12:21 pm

पुणे पोलीसांच्या समाजसेवा शाखेने कोथरुड परिसरात सुरू असलेले सेक्स रॅकेट गुरुवारी रात्री उदध्वस्त केले. पोलीसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून, पुण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱया आणि पोलीसांच्या हातावर तुरी देऊन सातत्याने फरार होणाऱया कल्याणी देशपांडे नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूडमधील भुसारी कॉलनीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर समाजसेवा शाखेच्या अधिकाऱयांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेथून वैश्यव्यवसाय करणाऱया चौघी जणींना अटक केली. यापैकी दोन तरुणी या उझबेकिस्तानच्या नागरिक आहेत. पोलीसांनी घटनास्थळावरून एका दलालालाही अटक केलीये. कल्याणी देशपांडे हिच हे सेक्स रॅकेट चालवत होती, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिचा शोध घेण्यात येतो आहे.
(संग्रहित छायाचित्र) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2013 12:21 pm

Web Title: sex racket busted in punes kothrud area
टॅग : Sex Racket
Next Stories
1 ‘स.प.’ प्रवेशांचा गोंधळ संपेना !
2 दिवसाला सरासरी चार जणांना डेंग्यू –
3 ‘सांबार’च्या दरवळात रंगल्या ‘रूपाली’, ‘वैशाली’च्या आठवणी!
Just Now!
X