24 September 2020

News Flash

हडपसरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; ४० वर्षीय आरोपी गजाआड

आरोपीने खाऊचे आमिष दाखवून चिमुरडीवर केला अत्याचार

पुण्यामध्ये हडपसर येथील वैदूवाडी येथे एका पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलीच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षांच्या नराधमाने हे अमानुष कृत्य केले आहे. हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गजानन लक्ष्मण चाकवते (वय ४०, रा. नवीन म्हाडा कॉलनी, बिल्डिंग नंबर ३, वैदूवाडी) असे आरोपीचे नाव आहे. हडपसरच्या वैदूवाडीतील म्हाडा कॉलनीमध्ये काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी गजानन चाकवतेने चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

अत्याचारानंतर तुमची मुलगी जिन्यावरुन पडल्याने जखमी झाल्याचे तिच्या आई-वडिलांना आरोपीने सांगितले. त्यामुळे पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तिला तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आली. पुढील उपचारांसाठी या चिमुरडीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 3:54 pm

Web Title: sexual harassment at five year old girl in hadapsar 40 year old accused detained
Next Stories
1 मुलाची आत्महत्या, धक्क्याने आईचाही मृत्यू; पिंपरीतील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2 पुण्यात किरकोळ वादातून मित्राची हत्या
3 दीड महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून दापोडीत १२ जणांनी केली तरुणाची हत्या
Just Now!
X