18 January 2019

News Flash

पिंपळे गुरव येथे नातेवाईकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

४८ वर्षीय आरोपी गजाआड

प्रातिनिधीक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून ४८ वर्षीय नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आपल्या आईसह ती वडिलांपासून वेगळे राहते. गेल्या जुलै महिन्यापासून आरोपी नातेवाईक हा वारंवार पीडित मुलीचा विनयभंग करीत होता. परंतू काल नातेवाईकाने घरात कोणी नसताना मुलीला पाणी मागण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडला आणि लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी कोणाला काही सांगितले तर तुझ्या आईसह तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही त्याने या मुलीला दिली. त्यामुळे ही मुलगी घाबरून गेली होती. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून तिने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला, त्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर तिच्यासह आईने थेट सांगवी पोलीस स्थानक गाठले. याप्रकरणी १४ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. टी. शिंदे करीत आहेत.

First Published on January 12, 2018 11:12 am

Web Title: sexual harassment on 14 year old girl by relative in pimple gurav