30 October 2020

News Flash

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघातात शबाना आझमी जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम

शबाना आझमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले. शबाना आझमी पुण्याच्या दिशेने जात होत्या.

एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. कारमध्ये चालक, शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तरसुद्धा होते. कारचा चालकसुद्धा जखमी झाला आहे. तर जावेद अख्तर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात आझमी यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शबाना आझमी यांच्या नाक आणि तोंडाला मार लागला आहे. दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

शुक्रवारी (१७ जानेवारी) जावेद अख्तर यांनी त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमासाठी हे दोघे पुण्याच्या दिशेने निघाले होते असं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 4:52 pm

Web Title: shabana azmi injured in a car accident near pune ssv 92
Next Stories
1 पुण्यात PUBG खेळताना तरूणाला झटका, उपचारादरम्यान मृत्यू
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा संसदेत नव्हे तर प्राणीसंग्रहालयात-उमर खालिद
3 साखर उद्योगातील अडचणींवर उपायमंथन
Just Now!
X