News Flash

‘शरदभाऊ साठे हे संघाचे जीवनव्रती’

ज्येष्ठ संघ कार्यकर्ते शरदभाऊ साठे हे व्यवसायाने वास्तुविशारद असले, तरी ते माणूस घडवणारे शिल्पकार आहेत आणि आदर्श संघ कार्यकर्ता, संघाचे जीवनव्रती हीच त्यांची खरी ओळख

| December 23, 2013 01:46 am

ज्येष्ठ संघ कार्यकर्ते शरदभाऊ साठे हे व्यवसायाने वास्तुविशारद असले, तरी ते माणूस घडवणारे शिल्पकार आहेत आणि आदर्श संघ कार्यकर्ता, संघाचे जीवनव्रती हीच त्यांची खरी ओळख आहे, अशा शब्दांत संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी साठे यांचा रविवारी गौरव केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते शरदभाऊ साठे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शरदभाऊ साठे सत्कार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मु. पं. बेंद्रे, सूर्यकांत पाठक, संघचालक नाना जाधव, शरद घाटपांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वास्तुरचनाकार म्हणून इमारती उभ्या करतानाच शरदभाऊ साठे यांनी संघकार्यात राहून असंख्य कार्यकर्ते आणि माणसेही घडवली. स्वत:च्या आदर्श जीवनाबरोबरच ते इतरांचीही जडणघडण करत गेले. संघटनेचा विचार चांगला असला, तरी तो विचार जगणारे कार्यकर्ते समोर असावे लागतात. तसे जिवंत उदाहरण साठे यांच्या रूपाने संघकार्यकर्त्यांसमोर आहे, असे जोशी म्हणाले.
एक शिस्तबद्ध संघटन हे संघाचे विशेषण ठरले आहे. साठे यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांमुळेच हे शक्य होते असे सांगून जोशी म्हणाले की, संघटनेची अंत:करणपूर्वक बांधिलकी स्वीकारलेले शरदभाऊ साठे हे संघाचे जीवनव्रतीच आहेत. ‘आपुलकीचा फार मोठा साठा शरदभाऊ साठे यांच्याकडे आहे आणि त्याच जोरावर त्यांनी कार्य यशस्वी केले आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जात आहे आणि ती योग्यच आहे,’ अशी भावना अ‍ॅड. बेंद्रे यांनी व्यक्त केली.
संघकार्य करताना फार मोठी उंची असलेली माणसे मी पाहिली. मी त्या व्यक्तिमत्त्वांकडे पाहून काम करत राहिलो, असे मनोगत साठे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त  केले. क्रीडा भारती संघटनेचे राज चौधरी, संघाचे पदाधिकारी डॉ. शरद कुंटे, सूर्यकांत पाठक यांचीही यावेळी भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 1:46 am

Web Title: sharad bhau sathe rss welcome pune
टॅग : Rss
Next Stories
1 … तर पूर्व भाग पालिका स्थापन करावी – अजितदादा
2 पुण्यातील ७९ अतिरिक्त शिक्षक सहा महिने वेतनापासून वंचित
3 माणसं वाचणाऱ्या अरण्यवेडय़ाचं ‘अक्षर’स्मारक!
Just Now!
X