शरद पवार हे जातीयवादी असल्यामुळेच आपण त्यांनी आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत सहभागी झालो नाही. मी जर तोंड उघडले तर त्यांची पळताभूई थोडी होईल, अशा कठोर शब्दांत जाहीर टीका भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर केली.

मुंबईत आयोजित भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, शरद पवार जतीयवादी असल्यानेच त्यांनी आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत आपण सहभागी झालो नाही. त्यामुळेच आगामी निवडणुकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत नव्हे तर, डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवारांवर आरोप करताना आंबेडकर म्हणाले, २००१ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रिपद होते. त्यावेळी शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच मिलिंद एकबोटेंवर कारवाई केली गेली नव्हती, असा गौप्यस्फोट त्यांनी मेळाव्यात बोलताना केला.