News Flash

पुणे : शरद पवारांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुबीयांची घेतली भेट

साने हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचे करोना विषाणूची बाधा झाल्याने उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. स्थानिक राजकारणात ते सक्रिय होते. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दत्ता साने यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच घातपाताची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. साने हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. अनेकदा त्यांना दुसऱ्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय दत्ता साने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करत सांत्वन केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे साने यांना मानले जात होते.  करोनाची लक्षणे आढळल्यानंतर २२ जून रोजी दत्ता साने यांचा स्वॅब घेतला होता, दोन दिवसानंतर ते करोना पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर तातडीने खासगी रुगणलायत उपचार सुरू केले. परंतु. त्यांना न्यूमोनिया, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याने प्रकृती खालावत गेली. शेवटच्या क्षणी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता अशी माहिती समोर आली होती. करोनाशी लढा देत असताना नगरसेवक दत्ता साने यांचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत असलेल्या करोना बाधित रुग्णांमुळे शहरातील किमान सात दिवस लॉकडाऊन वाढवून कडक करण्यात यावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:22 pm

Web Title: sharad pawar meat pimpri chinchwad sanes family kjp 91 nck 90
Next Stories
1 खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव रोखणार!
2 संशोधन संस्थांतील संशोधन प्रकल्प ठप्प
3 कोकण वगळता इतरत्र पाऊस ओसरणार
Just Now!
X