News Flash

राजू शेट्टींनी करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी करण्यात आलेल्या शिफारसीतून राजू शेट्टींचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

राजू शेट्टींनी करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
(प्रातिनिधिक छायाचित्र)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, शरद पवारांन आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी शब्द दिला होता. असं देखील माध्यमांसमोर बोलून दाखवलं आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली व मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे, असं देखील सांगितलं आहे.

शरद पवार म्हणाले, “राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, राज्यपालांकडे असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्या संबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधानं कशी केली जातात? किंवा आणखी काय, काय… पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलेलं आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही. पण मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत.”

“आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार”; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा

‘ईडी’चा वापर आतापर्यंत देशात अशाप्रकारे कधीच  झाला नव्हता –

तसेच, “ईडी ही यंत्रणा आतापर्यंत अशाप्रकारे कधीच या देशात वापरली गेलेली नव्हती. परंतु हल्लीच्या सरकारने या यंत्रणेचा वापर विरोधकांना नमवण्यासाठी करण्याची भूमिका घेतल्याची दिसते. त्यामुळे हे फक्त महाराष्ट्रातच नाही. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील काही राज्यांमध्ये होतंय. आपल्याला महाराष्ट्रातील माहीत असलेल्या लोकांची आपण चर्चा करतोय, पण हा गैरवापर महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, अन्य राज्यात देखील आहे.” असंही शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवलं.

“वेळा प्रत्येकाच्या येत असतात ; एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे”

मंदिर उघडण्यासाठी भाजपाने घेतलेल्या भूमिकेवर लगावला टोला –

याचबरोबर, मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून भाजपा, मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “केंद्र सरकराने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शन तत्व दिलेली आहेत. त्यामध्ये आणखी काही दिवस थोडी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यसरकार विशेषता मुख्यमंत्री कटाक्षाने आवाहन करत आहेत. आता अन्य घटकांची त्याबद्दलची काही विविध मतं असतील, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. परंतु, केंद्र सरकार ज्यावेळी अशी भूमिका घेतं. त्यावेळी कमीत कमी त्या केंद्र सरकारच्या विचाराचे जे राज्यात लोक आहेत, त्यांनी तरी तारतम्य ठेवायची आवश्यकता होती. यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही.”

सत्ताधाऱ्यांवरील टीका राजू शेट्टी यांना भोवली

हरियणामध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्यावरून सरकारवर टीका –

हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवरून शरद पवारांनी सरकारवर टीका केली, ते म्हणाले, “लाठीचार्ज ही तर गंभीर बाब आहे, त्याहीपेक्षा जवळपास १४ महिने शेतकरी घरदार सोडून त्या ठिकाणी बसले आहेत. थंडी, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता. संवेदनशील राज्यकर्ते असतील तर त्यांनी इतक्या दिवस शेतकरी बसतात, याची नोंद त्यांनी घ्यायला हवी होती. पण दुर्दैवं आहे या सगळ्या अन्नदात्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची भूमिका आहे.” अ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 6:02 pm

Web Title: sharad pawars first reaction after raju shettys warning said msr 87 svk 88
Next Stories
1 “ज्यांचा मुख्यमंत्री असतो, त्यांचंच सरकार,” संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
2 बाळासाहेब जेव्हा जाहीर सभेदरम्यान राज ठाकरेंना म्हणाले होते, “तू बोलतोस की मी जाहीर करू….”
3 धक्कादायक! ४० वर्षीय बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Just Now!
X